Sunday, November 21, 2010

शिवजयंती २०११ निमित्त स्मरणिका प्रकाशित होणार

सुभौम प्रकाशन या प्रकाशन संस्थेतर्फे १९ फेब्रुवारी २०११ रोजी शिवजयंती स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. या स्मरणिकेत अनेक इतिहास संशोधकांचे लेख व शिवकालाशी संबंधित विविध प्रकारची माहिती, फोटो वगैरे प्रकाशित करण्यात येणार आहे. तसेच शिवजयंती निमित्त घेण्यात येणार्‍या निबंध स्पर्धेतील निवडक निबंधही या स्मरणिकेत प्रकाशित करण्यात येणार आहेत.

 स्मरणिकेसाठी आपणही लेख शकता. लेख मराठी भाषेत, सुमारे ५०० शब्दांपर्यंत असावा. इमेलने या पत्त्यावर फक्त युनिकोडमध्ये पाठवावा किंवा साध्या पोस्टाने सुभौम प्रकाशन, पोस्ट बॊक्स नं. ५८, चिंचवड पूर्व, पुणे ४११०१९ या पत्त्यावर पाठवावा. (कुरियरने पाठवू नये). अधिक माहितीसाठी ९६२ ३७२ ५२४९ या नंबरवर फोन करावा.

No comments:

Post a Comment

Popular Posts